The Maharashtra State

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.

प्रशासन विभाग

पणन महासंघाच्या आस्थापनेवरील कायमस्वरुपी अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटी तत्वावरील कर्मचारी यांच्या आस्थापना प्रशासकीय विषयीच्या बाबी प्रशासन विभागामार्फत हाताळल्या जातात. त्याचप्रमाणे प्रशासन विभागांतर्गत येणारे न्यायालयीन दावे, सभा विभाग हाऊस किपींग विभाग इत्यादी कामकाज प्रशासन विभागामार्फत नियंत्रित केले जाते.

वित्त विभाग

पणन महासंघाने स्वत:चे व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केलेत, तसेच पणन महासंघाने शासनाच्या विविध योजना अत्यंत कार्यक्षमतेने राबविल्या आहेत प्रशासकीय खर्चात काटकसर केली आहे. त्याअनुषंगाने पणन महासंघाच्या आर्थिक ताळेबंद, व्यापारी पत्रक नफातोटा पत्रके बनविण्याचे कामकाज वित्त विभागामार्फत केले जाते. सेवकांचे पगार, लेखापरिक्षण वेगवेगळया विभागांसाठीच्या आर्थिक तरतुदी इत्यादी बाबी वित्त विभागामार्फत हाताळल्या जातात. 

मालमत्ता (गोदाम)

पणन महासंघ करीत असलेल्या व्यवसायांपैकी मालमत्ता (गोदाम) विभाग हा चांगले उत्पन्न देणारा विभाग आहे. पणन महासंघाची राज्यात १२८ गोदामे असून साठवणूक क्षमता २,८०,९४० मे. टन इतकी आहे. पणन महासंघाच्या गोमांचा प्रामुख्याने अन्नधान्ये, रासायनिक खते, बारदाना, कृषी अवजारे इत्यादी कृषी संबंधी मालाची साठवणूक करण्यासाठी वापर होत आहे. शासकीय योजनांसाठी प्राधान्याने गोदामाचा वापर करण्यात येतो. फेडरेशनला स्वत:च्या वापरासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेचा वापर झाल्यांनतर उर्वरित गोदाम क्षमता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ, बियाणे महामंडळ, फेडरेशनच्या सभासद संस्था, रासायनिक खत कंपन्याना भाडे तत्त्वावर देण्यात येतात.

नाफेड विभाग

पणन महासंघामार्फत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड एफसीआय यांच्या वतीने कडधान्य तेलबियांची खरेदी करण्याकरीता राज्य शासनाची प्रमुख अभिकर्ता संस्था म्हणुन पणन महासंघ काम पाहते. पणन महासंघामार्फत किमान आधारभुत खरेदी योजनेतंर्गत दरवर्षी खरीप रब्बी हंगामातील कडधान्य तेलबियांची खरेदी करण्यात येते. सदर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाचे वर्ग सभासद, वर्ग सभासद फार्मर प्रोडयुसर कंपनी यांची नियुक्ती जिल्हा पणन कार्यालय स्तरावरुन करण्यात येते. केंद्र शासनाने दिनांक ११ ऑक्टोंबर २००८ नुसार कडधान्य तेलबियांचे किमान आधारभुत खरेदी योजना अंतर्गत खरेदी करण्यासाठीचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात नाफेड भारतीय अन्न महामंडळ यांच्यामार्फत कडधान्य तेलबियांची खरेदी करण्यात येते.

राज्य शासन विभाग

राज्यात किमान आधारभुत खरेदी योजने अंतर्गत राज्यातील बिगर आदिवासी प्रवर्गातील क्षेत्रात धान भरडधान्य खरेदी करण्याकरिता पणन महासंघाची शासनाची प्रमुख अभिकर्ता संस्था नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार दरवर्षी माहे सप्टेंबरमध्ये धान खरेदी आदेश शासन स्तरावरुन निर्गमित करण्यात येतात. पणन महासंघामार्फत जिल्हा निहाय तालुक्यावरील वर्ग सभासद संस्थांची उपअभिकर्ता संस्था म्हणुन नेमणुक करुन त्यांच्या मार्फत सदर धान भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात येते. किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरेदी करण्यात आलेले धानाची पणन महासंघाने नियुक्त केलेल्या मिर्लसद्वारे भरडाई करण्यात येते.

खत विभाग

मार्कफेड राज्य एजन्सी म्हणून RCF, IFFCO, CRIBHCO इत्यादींची खते विकते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने खते बफर स्टॉक योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्कफेड नोडल एजन्सी म्हणून काम करते. मार्कफेड मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि सेंद्रिय खते देखील विकते.

आमचे किरकोळ आणि कार्यरत खत विक्री केंद्र अहमदनगर आणि चंद्रपूर येथे आहे ज्यामुळे मार्कफेड खाजगी वितरकांकडून होणार्‍या जास्त नफेखोरीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

येथे मार्कफेडचे 3 खत कारखाने आहेत

१. चिखलठाणा, जिल्हा औरंगाबाद

२. येळगाव, जिल्हा बुलढाणा

३. नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद

मार्कफेडचा “भगीरथ” मिश्र खताचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे

बुलढाणा कारखान्यात मिश्र खतांसोबत पीओएम आणि पीडीएम उत्पादने तयार केली जात आहेत.

मार्कफेड “वैभव” ब्रँडच्या पशुखाद्याचे उत्पादन करते आणि ते येथे आहे

बोरविहीर, जिल्हा धुळे

नेप्ती, जिल्हा अहमदनगर

विक्री सहकारी आणि खाजगी वितरकांमार्फत केली जाते.

शेतकऱ्यांना रास्त भावात चारा मिळावा हा यामागचा उद्देश आहे.

गुरांचा चारा विभाग

वैभव पशुखाद्य विभागांतर्गत वैभव पशुखाद्य कारखाना बोरविहीर, धुळे व वैभव पशुखाद्य कारखाना, नेप्ती, अहमदनगर असे २ कारखाने आहेत. या कारखान्यात अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. वैभव पशुखाद्य कारखाना बोरविहीर, धुळे येथे असलेला कारखाना दर्जेदार व सकस पशुखाद्य तयार करतो. उत्पादित पशुखाद्य हे प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात विकले जाते. महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी शेळी-मेंढी विकास महामंडळ यांनाही त्यांच्या मागणीनुसार पशुखाद्य पुरवठा केला जातो.

 

वैभव पशुखाद्य कारखाना, नेप्ती, अहमदनगर कारखाना बंद आहे. कारखाना चालू ठेवण्यासाठी आणि पी.पी.पी. तत्वतः देण्याचा प्रयत्न झाला पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कारखान्याच्या आवारातील गोडाऊन भाड्याने देण्यात आले आहेत.

कायदा विभाग

कायदा विभागा अंतर्गत पणन महासंघाने व पणन महासंघाविरुद्ध दाखल केलेल्या दाव्याचे कामकाज पाहीले जाते. सदरचे दावे संपूर्ण महाराष्ट्रात दाखल करण्यात येतात. पणन महासंघाच्या सर्व विभागातील करारनामे करणे, विभागीय चौकशी करणे इत्यादी कामकाजामध्ये अभिप्राय देवून पुढील कामकाज करण्यास मदत केली जाते. धान खरेदी व्यवहारामध्ये धान किंवा तांदूळ (CMR) जमा न केल्यास संबंधितांवर गुन्हा (FIR) दाखल करण्याकरीता संबंधित जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात येते. पणन महासंघाच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व कायदेशिर बाबींचे कामकाज पाहण्यात येते.

वसुली विभाग

वसुली विभागाअंतर्गत जिल्हानिहाय अवार्ड अंतर्गत येणेबाकीचा आढावा घेऊन वसुलीसाठी कायदेशीर कारवाई तसेच, ॲवार्डची अंमलबजावणीबाबत पाठपुरावा करण्यात येतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 चे कलम १५६ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम १०७ नुसार वसुली दाखल्याची (ॲवार्डची) अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी/ कारखाना व्यवस्थापक यांना विशेष वसुली व विक्री अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांनी पदनिहाय अधिकार प्रदान केलेले असून त्यांच्यामार्फत वसुलीची कार्यवाही सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष २0२३

२0२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष (International Year Of Millets) म्हणुन घोषित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्षामुळे जागतिक स्तरावर पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढवणे, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे तसेच फुड बास्केटचा मुख्य घटक म्हणुन तृणधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी संपुर्ण अन्नप्रणालीमध्ये उत्तम संपर्काला प्रोत्साहन देणे या सर्वांसाठी संधी उपलब्ध होणार आहेत. 

तृणधान्यामध्ये प्रमुख तृणधान्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा समावेश तर लघु तृणधान्यामध्ये राळा, कुटकी, कोडा/कोद्रा, सावा भगर यांचा समावेश होतो. सदर तृणधान्याची विक्री पणन महासंघ “(जागर) (Jagar) या ब्रॅण्डनेम खाली करणार आहे. 

भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त कृषी उत्पादने

भौगोलिक उपदर्शन (Geographical Indication) म्हणजे एका विशिष्ट स्थानामुळे एखादी वस्तू उत्पादनास प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा वेगळेपण होय. वस्तू उत्पादनास प्राप्त असाधारण गुणधर्म हा त्या जागेतील विशिष्ट पाणी, माती, वातावरण   इतर नैसर्गिक घटक यातून निर्माण होतो. एका विशिष्ट परिसरातील मुळ कृषी विषयक, नैसर्गिक आणि उत्पादित माल ओळखण्यासाठी भौगोलिक उपदर्शनचा वापर करतात.

पणन महासंघाने राज्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त असलेल्या (G.I. Tagging) कृषी उत्पादनांना राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन जीआय उत्पादनांचे विपणन विक्री करण्याचे ठरविले आहे. सध्या मंगलवेढा ज्वारी, नवापूर तुरडाळ, पुणे आंबेमोहर तांदुळ, आजरा घनसाळ तांदुळ, भंडारा चिन्नोर तांदुळ, डहाणू चिक्कू पावडर, वेंगुर्ला काजू, सांगली बेदाणा, वायगाव हळद, सांगली हळद भिवापूर मिरची पावडर असे एकूण ११ जीआय कृषी उत्पादनांची त्याचबरोबर कोल्हापूरची नाचणी आणि सोलापूर ज्वारी या नॉन जीआय उत्पादनाची विक्री पणन महासंघाच्या जिल्हा पणन कार्यालये, किरकोळ विक्री केंद्रे, विक्री महोत्सव क्रेडीट सोसायटी यांचेमार्फत पणन महासंघाच्या महामार्कफेड नाममुद्रेखाली विक्री करण्यात येत आहे.