The Maharashtra State Co-op. Marketing Federation Ltd.
Marathi Website(मराठी वेबसाईट)

Activities - Departments Of Federation

आधारभूत किंमत खरेदी योजना

२००८-०९ या हंगामात राज्यात खरीप हंगामात आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्याची खरेदी करण्याबाबतची खरेदी योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रमुख अभिकर्ता म्हणून फेडरेशनमार्फत राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत एकूण २६४ खरेदी केंद्रे उघडण्यात आली. अहवाल सालात ज्वारी/ बाजरी/मका व धान या धानाची एकूण १७,२९,४१४ क्विं.खरेदी झाली.धान्य खरेदी क्विंटल मध्ये

--
खरेदी क्विंटल मध्ये
ज्वारी
५१२९१७
बाजरी
८६०२
मका
५८४८२१
भात
६९३२७४
एकूण
१७२९४१४
व्दार वितरण योजना

शासनाने दुष्काळ व अवर्षणग्रस्त भागात रेशन माल वितरण करण्याचे काम फेडरेशनकडे सोपविले आहे. अहवाल सालात शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या ९२ वाहनामधून ३५,४१,६००.७८ क्विं. रेशन मालाचे वाटप करण्यात आले होते.

जीवनावश्यक किरकोळ विक्री केंद्र

सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना उपजिवीकेचे साधन उपलब्ध व्हावे व त्याच बरोबर नागरिकांना रास्त दरात जिवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात या हेतूने राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे, मुंबई शहरात ही योजना सन १९७९ पासून सुरु झालेली आहे. फेडरेशनचे सध्या मुंबईमध्ये ८७ व पुणे येथे २ किरकोळ विक्री केंद्र कार्यान्वीत आहेत.

खनिज तेल

अहवाल सालात फेडरेशनच्या वडाळा व मनमाड डेपोमार्फत मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्र व मनमाड शहर व नाशिक जिल्हयांमध्ये शासकीय धोरणानुसार केरोसीन वितरण करण्यात आले असून अहवाल सालात दोन्ही डेपोमार्फत झालेल्या केरोसीन विक्रीचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

डेपोचे नाव
कि. लिटर
रक्कम रुपये
वडाळा
१२,००८
१०,३९.०९,२८८/-
मनमाड
२,३५२
२,१२,६१,९०३/-
एकूण
१४,३६०
१२,५१,७१,१९१/-
फिरती शिधावाटप दुकाने

बृहन्मुंबई रेशनिंग कार्डधारकांना विविध वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शासनाने फेडरेशनकडे १० फिरती शिधावाटप दुकाने दिलेली असून अहवाल सालात या दुकानापासून रु. ३,००,०००.०० सेवाशुल्क फेडरेशनला प्राप्त झाले आहे.

सुर्यफुल

अहवाल सालात फेडरेशनने नाफेडच्या वतीने सुर्यफूल २८,०१५.२६ क्विंटल खरेदी केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असून, अल्प भू-धारक शेतकरी आणि शेतमजूर यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी जनावरांना सकस पशुखाद्य मिळावे व दुधाचे अधिक उत्पादन व्हावे या उद्देशाने फेडरेशनने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन धुळे जिल्हयांतील बोरविहीर आणि अहमदनगर जिल्हयातील नेप्ती या ग्रामीण भागात पशुखाद्य निर्मितीसाठी कारखान्याची उभारणी केली आहे.

माहे मार्च २००९ अखेर संपलेल्या वर्षात १९.३३८ मे.टन पशुखाद्याचे दर्जेदार उत्पादन केलेले आहे व १९,३०१ मे.टनाची विक्री केलेली आहे. या बाबतचा गेल्या तीन वर्षाचा तुलनात्मक अहवाल खालील प्रमाणे आहे.फेब्रुवारी २००८ पासून नेप्ती अहमदनगर येथील कारखाना रॉयल्टी बेसीसवर चालविण्यास दिलेला आहे.

उत्पादन (आकडेवारी मे. टनात)
कारखाना
२००५-०६
२००६-०७
२००७-०८
२००८-०९
बोरविहीर धुळे
२१,२१२
२१,२१८
१९,५३७
१९,३३८
नेप्ती अहमदनगर
४,१८४
२,७८०
३८९
--
एकूण
२५,३९६
२३,९९८
१९,९२६
१९,३३८
विक्री (आकडेवारी मे. टनात)
कारखाना
२००५-०६
२००६-०७
२००७-०८
२००८-०९
बोरविहीर धुळे
२१,१७३
२१,१४५
१९,४२४
१९,३०१
नेप्ती अहमदनगर
४,६०२
२,७४४
४१३
--
एकूण
२५,७७५
२३,८८९
१९,८३७
१९,३०१

सहकारी संस्थांना प्रगती पथावर आणण्याचे हेतूने मुख्यत: सहकारी संस्थामार्फत वैभव पशुखाद्याची विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच खाजगी वितरक यांचे मार्फतही पुरवठा केला जातो. अहवाल सालात एकूण रु. १३,३० कोटीची उलाढाल झाली आहे.

२००८-०९ सालात ४,०२,१८५ मे.टन एकूण खताची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अहवाल सालातील खत विक्री मध्ये वाढ झाली असून विक्री रोखीने करण्यात आलेली आहे.

मागील चार वर्षातील व अहवाल सालातील खत विक्रीचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

(आकडेवारी टनात)

खताचा प्रकार
२००४-०५
२००५-०६
२००६-०७
२००७-०८
२००८-०९
एकूण
२,०८,६३४
१,९७,७०४
२,५४,६६५
२,६८,०००
४,०२,१८५

२००८-०९ सालामध्ये हया विभागाची उलाढाल रु २५७.९२ कोटीची झाली असून या व्यवहारामध्ये ढोबळ नफा रक्कम रु. ३,३१,०८,७५५/- झालेला आहे.

भगीरथ दाणेदार मिश्र खत विभाग

सन २००८-०९ या वर्षासाठी फेडरेशनचे, औरंगाबाद, बुलढाणा, नळदुर्ग हे तिन्ही भगीरथ मिश्रखत कारखाने प्रती. मे. टन रु. ४००/- अधिक ४ टक्के वॅट असे एकूण रु. ४१६/- प्रती. मे. टन दराने राॅयल्टि बेसिस वर भगीरथ मिश्र खताचे उत्पादन करण्यास चालविण्यास दिलेले असून तिन्ही कारखान्यामध्ये एकूण ५०,००० मे. टन उत्पादन तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. निश्चित केलेल्या उत्पादनाच्या उद्दिष्टाप्रमाणे तिन्ही कारखान्यात पुढीलप्रमाणे भगीरथ खताचे उत्पादन करण्यात आले आहे.

उद्दिष्टानुसार उत्पादनाची माहिती खालीलप्रमाणे

कारखाना
ठरवून दिलेले उद्दिष्ट मे. टन
प्रत्यक्ष उत्पादन मे. टन २००८-०९
औरंगाबाद
३०,०००
१२,३८८
बुलढाणा
१०,०००
१५,०३१
नळदुर्ग(उस्मानाबाद)
१०,०००
३,०५७
एकूण
५०,०००
३०,४७६

वरील प्रमाणे मार्च २००९ अखेर प्रत्यक्ष झालेले उत्पादन मे. टन ३०,४७६ ची राॅयल्टि रक्कम रु. १,२६,७८,०१६/- फेडरेशनला प्राप्त झाली आहे.

पंपसंच सन १९७५ पासून कृषी व ग्रामीण विकास बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज दाखल्यावर शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आॅईल इंजिन पंपसेट व इलेक्ट्रिक पंपसेटचा पुरवठा केला होता. परंतु मागील ४ ते ५ वर्षापासून बॅंकाकडून कोणत्याही प्रकारची मशिनरी पुरवठ्याची प्रकरणे प्राप्त झालेली नाहीत.

तथापि शासनाच्या कृषी खात्याच्या विशेष घटक योजना व आदिवासी योजनेअंतर्गत अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या पंपसंचाचा पुरवठा, तसेच शेती अवजारे याचा पुरवठा करण्याचे काम फेडरेशनला मिळालेले होते. २००८-०९ सालामध्ये जिल्हा परिषदांना अनुदान तत्वावर १) एच. डी. पी. ई. पाईप्स, २८०२३४ २) ५ हॉ. पाॅ. विद्युत पंप, ४२५ ३) ५ हॉ. पाॅ. विद्युत पंप, १९१८ ४) -५ हॉ. पाॅ. आॅईल पंप, २६५ ५) पाॅवर टिलर, ५१ रोटावेटर, ४९५ मिरची कांडप यंत्र, इत्यादीचा पुरवठा विविध जिल्हा परिषदांना करण्यात आलेला आहे. सन २००८-०९ मध्ये मशिनरी विभागाची उलाढाल रु. २३.७८ लक्ष झाली असून रु. ५५,७७,९७७/- ढोबळ नफा झालेला आहे.

फेडरेशनने महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यात एकूण १२५ गोदामे बांधली असून त्यांची साठवणूक क्षमता २,५०,७०० मे. टन आहे. सदरची गोदामे जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने एन. सी. डी. सी. मार्फत राबवल्या जाणाऱ्या गोदाम जाळे योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली आहेत. या गोदामात जिल्हा मार्केटिंग अधिकारी हे आवश्यकतेप्रमाणे खते, मशिनरी, अन्नधान्य, बारदाना, व इतर सामुग्रीची साठवणूक करतात. त्याशिवाय सभासद संस्था, इतर सहकारी संस्था, खत उत्पादक कंपन्या, कापूस पणन महासंघ, इत्यादींचा माल गोदामांमध्ये साठविण्यात येतो. त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ, बियाणे महामंडळ, यांनाही काही गोदामे भाड्याने देण्यात आलेली आहेत. उपलब्ध साठवणूक क्षमतेचा सन २००७-२००८ कालावधीसाठी सरासरी ७१ टक्के वापर झालेला आहे. गोदाम क्षमता आणि क्षमतेचा वापर याबाबतची माहिती खालीलप्रमाणे.

एकूण गोदामे १२६ क्षमता २,७०,५४० मे. टन.

महिना
सरासरी क्षमता वापर टक्के
एप्रिल-२००८
७२.००
मे-२००८
७४.३९
जून-२००८
७४.८६
जुलै-२००८
७४.५२
ऑगस्ट-२००८
७३.३२
सप्टेंबर-२००८
७३.१४
ऑक्टोंबर-२००८
७२.९७
नोव्हेंबर-२००८
७२.२८
डिसेंबर-२००८
७३.२८
जानेवारी-२००९
७३.२७
फेब्रवारी-२००९
७३.४१
मार्च-२००९
७४.६२

सरासरी वापर क्षमता वापर ७१ टक्के.

सन २००८-०९ मध्ये या विभागापासून रु.५,४८,२७,०२७/- उत्पन्न मिळाले आहे.